गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आपडेट Silt Free Dam and Silt Shiwar Scheme
Silt Free Dam and Silt Shiwar Scheme गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविणेबाबत. अशासकीय संस्थाची निवड करणे आहे. शासन परिपत्रक काय आहे पहा. राज्यातील जलसाठ्यामधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील जलसाठ्यातील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी, गाळमुक्त धारण गाळयुक्त शिवार ही योजना कायमस्वरूपी राज्यात राबविण्याचा निर्णय दिनांक २०.०४.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे. सदर योजनेंतर्गत जलसाठ्यांमधून गाळ काढण्याची अंमलबजावणी ही अशासकीय संस्थामार्फत करण्यात येणार आहे. त्यासाठी संस्था निवडीचे निकष खालीलप्रमाने असतील:- गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आपडेट Silt Free Dam and Silt Shiwar Scheme १) अशासकीय संस्थेने नोंदणी प्रमाणपत्रासह त्यांचे ३ वर्षांचे ऑडिट केलेले कागदपत्रे अद्ययावत असावे. २) गाळ काढण्यासाठी घेतलेल्या कामांचा संख्येचा प्रमाणात जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत व जलसाठा पातळीवर स्मार्टफोनवर डेटा प्रविष्ट करण्यास सक्षम असणारे पुरेसे कर्मचारी वर्ग नेमणूक करण्यास अशासकीय संस्था सक्षम असावे. ३) अशासकीय संस्थेकडे यापूर्वी गाळमुक्त धरण गाळयुक्त शि