गुढीपाडवा कशी साजरी करतात ,काय आहे महत्व.
गुढीपाडवा कशी साजरी करतात ,काय आहे महत्व. सर्व प्रथम तुम्हांला गुडीपाडवा मराठी नुतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा..🙏 गुडीपाडवा म्हणजे चैत्र महिन्याची सुरुवात ज्या दिवशी होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा आहे. महाराष्ट्रामध्ये साजरा होणारा गुढीपाडवा शुभ साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उंच उभी करतात. गुढी ही सर्व वाईट शक्तींना आपल्यापासून दूर ठेवून आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धीला येण्यासाठी आमंत्रित करते. गुढीपाडवा कसा साजरा केला जातो..? चैत्र हा हिंदू पंचांगाचा पहिला महिना. चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडवा हा एक हिंदू सण असून तो खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये लोक आपल्या घराच्या पुढे गुढी उभारून हा दिवस साजरा करतात. ह्यादिवशी बांबूच्या लांब काठीच्या एका टोकाशी तांब्याचा कलश, एक वस्त्र, कडुलिंबाची पाने आणि साखरेचे बत्ताशे घाटी लावून, पूजा करून घराबाहेर दाराजवळ हि गुढी उभारली जाते. गुढीभोवती सुंदर रांगोळी काढली जाते आणि फुले वाहिली जातात. आणि दर्शन घेतले जाते. गुढीपाडवा कशी साजरी करतात ,काय आहे मह