खेड्यातील शेतकऱ्याचे वास्तव....? The reality of a village farmer...?
खेड्यातील शेतकऱ्याचे वास्तव....?
The reality of a village farmer...? |
खेड्यातील शेतकऱ्याचे वास्तव....? The reality of a village farmer...?
➤ 2013 मध्ये मी कापूस 7500/- रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि 2023 ला कालच मी कापूस 7900/- रुपये प्रति क्विंटल विकला आहे.
➤ फरक इतकाच आहे 2013 मध्ये डिएपी खताची 560 रुपया ला एक बॅग होती, आज 1900 रुपया ला एक बॅग आहे.
➤ तेव्हा कापूस वेचणी मजुरी 3 रुपये किलो होती, आता 10 रुपये किलो आहे.
➤ तेव्हा 400 रुपया ला गॅस भरत होता, आज आज 1200 ला झालाय.
➤ 2013 ला ट्रॅक्टर ट्रॉली रोटर मशिन सह सहा लाखात सहज बसून जात होते, आज तेच संपूर्ण सेट घेतला तर 11 लाख लागत आहे.
खेड्यातील शेतकऱ्याचे वास्तव....? The reality of a village farmer...?
➤ तेव्हा मिळणार 15000 चा बैल आज 55000 हजाराच्या झालाय.
➤ आधी 50,000 मिळणारी मोटासायकल ज्या वर लोक 60 रुपये लिटर पेट्रोल टाकून गावो गावी चहा पावडर , भांडी, कपडे, कुल्फी, भेळ असे काही विकून उदरनिरवाहासाठी दोन पैस कमवत होते आज तिचं गाडी 1,10,000 वर नेऊ ठेवली.
➤ .... ने आणि तिचे पेट्रोल 110 वर गेलं... साधारण एकंदरीत कोणतीच गोष्ट सोपी नाही ठेवली. इतका टॅक्स जुजबी कर वसुली का देशात एकंदरीत पहिल्या गेला तर शेतकरी 25 रुपये किलो ने गहू विकत आहे तोच गहू दुकानदार 50 रुपये ने विकत आहे असे धान्य चा काळा बाजार जोरात सुरू असून तरी अँधभक्त गप आहेत. वरील सर्व वाढलेल्या किमतींच्या मानाने आज कापसाला काय भाव असावा.
सांगा ना आता का दातखिळी बसली.
सदरील लेख स्वतः च्या अनुभवतला आहे कुणाला उद्देशुन नाही .
Comments
Post a Comment