गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पहा अनुदान किती / Silt Free Dam and Silt Shiwar Scheme
गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पहा अनुदान किती पहा . Silt Free Dam and Silt Shiwar Scheme महाराष्ट्र शासन मृद व जलसंधारण विभाग दिनांक : २० एप्रिल २०२३ प्रस्तावना काय आहे वाचा :- Silt Free Dam and Silt Shiwar Scheme महाराष्ट्र राज्य हे देशात जास्त धरणे व जलसाठे असलेले राज्य असून या धरणामध्ये दरवर्षी साठत चाललेल्या गाळामुळे धरणांच्या साठवण क्षमतेत मोठया प्रमाणात घट झालेली आहे. या धरणांमध्ये साचलेला गाळ उपसा करून शेतात पसरविल्यास धरणांची मुळ साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ही बाब विचारात घेऊन शासनाने राज्यातील धरणांमधील गाळ काढणे व तो शेतामध्ये वापरणे यासाठी राज्यातील धरणांधील गाळ काढून तो शेतात पसरविण्यासाठी ग्राम विकास व जलसंधारण विभाग, शासन निर्णय दिनांक ०६ मे, २०१७ अन्वये Silt Free Dam and Silt Shiwar Scheme "गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राबविण्यात आली होती. सदर योजनेची मुदत मार्च, २०२१ अखेरीस संपलेली असल्याने सदर योजना यापुढे ३ वर्षांसाठी राबविणेबाबत दि. १६.०१.२०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये मुदतवाढ दिली आहे. परंतु जलस