तंत्र शिक्षण संचालनालय पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका अध्यापकांना मानधन दरात वाढ.Increase in the rate of honorarium for post graduate teachers.
Increase in the rate of honorarium for post graduate teachers. |
तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील विविध पदवी, पदव्युत्तर पदवी व पदविका अभ्यासक्रमांसाठी निमंत्रित अभ्यागत अध्यापकांना प्रदान करावयाच्या मानधनाचे दरात वाढ.Increase in the rate of honorarium for post graduate teachers.
महाराष्ट्र शासन
दिनांक: १७ एप्रिल २०२३
काय आहे प्रस्तावना :
तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र/ औषधनिर्माणशास्त्र / हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी / व्यवस्थापन महाविद्यालये/ तंत्रनिकेतने या संस्थांमध्ये विविध क्षेत्रांतील तज्ञ व्यक्तींना निमंत्रित करून अध्यापन / मार्गदर्शनाकरिता त्यांच्या सेवा वेळोवेळी प्राप्त कराव्या लागतात. सदरहू क्षेत्रांतील अनुभवी, तज्ञ मान्यवरांना अल्प मानधनाच्या आधारे आकर्षित करून अभ्यासक्रमाचा दर्जा टिकविणे सद्यस्थितीत, जिकिरीचे होत आहे. त्यानुषंगाने, तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील अभ्यासक्रमांकरिता निमंत्रित करण्यात येणाऱ्या अभ्यागत अध्यापकांच्या मानधनात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.Increase in the rate of honorarium for post graduate teachers.
शासन निर्णय काय आहे .
संदर्भाधीन शासन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे.Increase in the rate of honorarium for post graduate teachers.
२. उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील संस्थांमधील विविध अभ्यासक्रमांसाठी निमंत्रित करण्यात येणाऱ्या अभ्यागत अध्यापकांना प्रदान करण्यात येणाऱ्या मानधनाकरिता खाली दर्शविल्याप्रमाणे सुधारित दर लागू करण्यास मंजुरी देण्यात येत आहे-Increase in the rate of honorarium for post graduate teachers.
अ. क्र. तंत्र शिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील अभ्यासक्रम विद्यमान दर सुधारित दर (प्रति तास)
१. अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र / औषधनिर्माणशास्त्र /
हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, व्यवस्थापन
महाविद्यालये/ तंत्रनिकेतने यांमधील अभ्यासक्रमांसाठी
उद्योग / व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित केलेले तज्ञ |
अनुभवसंपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर
व्याख्यान रू. १०००/- रू. १५००/-
२. अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र/ औषधनिर्माणशास्त्र/ हॉटेल
मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, व्यवस्थापन इ.
पदवी/ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी आमंत्रित
अभ्यागत अध्यापकांसाठी मानधन-
१. सैद्धांतिक रू.६००/- रू.९००/-
२. प्रात्यक्षिक औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमातील
औषधनिर्माणशास्त्र प्रयोगशाळा प्रात्यक्षिके / ट्युटोरियल,
आरेखन, वास्तुशास्त्र मधील आरेखन कामे रु.३००/- रु. ४५०/-
३. अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र / औषधनिर्माण शास्त्र / हॉटेल
मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, इ. संस्थेतील पदविका
अभ्यासक्रमासाठी आमंत्रित अभ्यागत अधिव्याख्यातांसाठी
मानधन-
१. सैद्धांतिक रू. ५००/- रू.८००/-
२. प्रात्यक्षिक औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमातील
औषधनिर्माणशास्त्र | प्रयोगशाळा प्रात्यक्षिके / ट्युटोरियल,
आरेखन वास्तुशास्त्र मधील आरेखन कामे रू. २५०/- रु. ४५०/-
४. अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र / औषधनिर्माण शास्त्र /
हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड | केटरिंग टेक्नॉलॉजी.
व्यवस्थापन इत्यादी पदवी / पदव्युत्तर महाविद्यालयांतील
नियमित आस्थापनेवरील अध्यापकांनी त्यांच्या पदानुसार
निश्चित तासिकांपेक्षा जास्त तासिका घेतल्यास अधिकचे
१. सैद्धांतिक रू.३००/- रु. ४५०/-
२. प्रात्यक्षिक / ट्युटोरियल / आरेखन कामे इत्यादी रू.१५०/- रु. २२५/-
५. अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र / औषधनिर्माण शास्त्र /
हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी, व्यवस्थापनशास्त्र
इत्यादी पदविका संस्थांमधील नियमित आस्थापनेवरील
अधिव्याख्यात्यांनी त्यांच्या पदानुसार निश्चित तासिकांपेक्षा
जास्त तासिका घेतल्यास अधिकचे अतिरिक्त मानधन-
१. सैद्धांतिक रु. २५०/- रू.४००/-
२. प्रात्यक्षिक / ट्युटोरियल / आरेखन कामे इत्यादी रू.१२५/- रू.२००/-
४. उपरोक्तप्रमाणे अभ्यागत अध्यापकांच्या मानधनात करण्यात येत असलेली सुधारणा पुढील अटींच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे- Increase in the rate of honorarium for post graduate teachers.
(१) अभ्यागत अध्यापक निमंत्रित करण्यापूर्वी संस्थेतील संबंधित विद्याशाखेतील सर्व कार्यरत शिक्षकांना प्रमाणकांनुसार शैक्षणिक भार दिला आहे. याबाबत संबंधित संस्थेच्या प्राचार्य / संचालक यांनी खात्री करावी.
(२) सेवानिवृत्त अध्यापक वा संबंधित अभ्यासक्रमाशी निगडित उद्योग क्षेत्रातील/ व्यवसायातील अनुभवसंपन्न व्यक्तींना, तासिका तत्त्वावरील अध्यापनासाठी निमंत्रित करण्यात यावे. मात्र, सेवा प्रव नियमांतील तरतुदीनुसार विहित करण्यात आलेली • किमान शैक्षणिक अर्हता व अनुभव अभ्यागत अध्यापकांनी धारण करणे आवश्यक असेल.
Increase in the rate of honorarium for post graduate teachers.
(३) तासिका तत्त्वावरील अध्यापकांची नियुक्ती एका शैक्षणिक वर्षासाठी कमाल ९ महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करता येईल. सदर कालावधी संपुष्टात •आल्यानंतर सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल..
(४) तासिका तत्वावरील कोणत्याही उमेदवारास एकाच महिन्यात त्यांच्या दर्जाच्या अनुज्ञेय वेतनश्रेणीतील सुरूवातीच्या वेतनश्रेणीच्या रकमेपेक्षा जास्त मानधन द्यावे लागू नये, याची जबाबदारी संबंधित महाविद्यालय/ तंत्रनिकेतनाच्या प्राचार्यांची असेल..
(५) सदर प्रयोजनार्थ येणाऱ्या खर्चास अतिरिक्त निधी मंजूर करण्यात येणार नाही. सबब, याकरीता येणारा खर्च हा संस्थेकडे उपलब्ध असणाऱ्या निधीतून / मंजूर अनुदानातूनब्करणे आवश्यक असेल.
(६) तासिका तत्त्वावरील नियुक्ती ही तात्पुरत्या स्वरूपातील नियुक्ती असून त्यामुळे नियमित सेवेचे कोणतेही हक्क प्राप्त होणार नाहीत. यास्तव, "भविष्यात सेवेत कायम करण्याची मागणी करणार नाही. तसेच, नियमित सेवेच्या कोणत्याही हक्कांची मागणी करणार नाही" असे संबंधित अध्यापकाकडून रु. १००/- च्या स्टॅम्प पेपरवर हमीपत्र घेण्यात यावे.
(७) प्रत्यक्ष उपलब्ध कार्यभार आणि तासिका तत्त्वावरील मानधनाचे प्रदान याबाबत अनियमितता आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य/ संचालक यांची राहील.
(८) अभ्यागत अध्यापकांच्या मानधनाचे सदर सुधारित दर दिनांक ०१ एप्रिल २०२३ पासून लागू होतील.
Increase in the rate of honorarium for post graduate teachers.
Comments
Post a Comment