केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना निर्णय | The Union Cabinet decided on Pradhan Mantri Ujjwala Yojana
केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी केले अनुदान मंजूर..!
केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
च्या लाभार्थ्यांना अनुदान
PMUY लाभार्थ्यांसाठी 14.2 किलोच्या एका सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी दरवर्षी 12 रिफिलपर्यंत मंजूर
या योजनेंतर्गत 9.59 कोटी लाभार्थी आहेत
नवी दिल्ली, 24 मार्च 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12 रिफिलसाठी प्रति 14.2. किलोच्या सिलिंडरसाठी 200 रुपये अनुदान द्यायला मान्यता दिली आहे. 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9:59 कोटी लाभार्थ्यांची नोंद झाली.
2022-23 या आर्थिक वर्षासाठी एकूण 6,100 कोटी रुपये आणि 2023-24 साठी 7.680 कोटी रुपये खर्च केले जातील. पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम थेट जमा केली जाते. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड , भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या 22 मे 2022 पासून हे अनुदान देत आहेत.
विविध भू-राजकीय कारणांमुळे एलपीजी (घरगुती वापरासाठीचा गॅस) च्या आंतरराष्ट्रीय किमतीत मोठी वाढ झाली आहे. एलपीजीच्या वाढलेल्या दरांपासून लाभार्थीचे संरक्षण करणे महत्त्वाचे आहे.
ग्राहकांना एलपीजीच्या दरात दिलासा दिला तर ते एलपीजीच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित होतात. उज्ज्वला योजनेतल्या ग्राहकांनी पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळावे यासाठी त्यांनी सतत एलपीजीचा अवलंब आणि वापर करणे महत्त्वाचे आहे योजनेतील ग्राहकांचा एलपीजीचा सरासरी वापर 2019-20 मधील 3.01 रिफिलवरून 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झाला आहे. सर्व लाभार्थी या अनुदानासाठी पात्र आहेत.
ग्रामीण आणि वंचित गरीब कुटुंबांना लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी), स्वच्छ स्वयंपाक ईंधन उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने मे 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली. गरीब घरातील प्रौढ महिलांना डिपोझिट न ठेवता मोफत एलपीजी जोडणी या योजने अंतर्गत दिली .
केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना
च्या लाभार्थ्यांना अनुदान
PMUY लाभार्थ्यांसाठी 14.2 किलोच्या एका सिलिंडरवर 200 रुपयांची सबसिडी दरवर्षी 12 रिफिलपर्यंत मंजूर
या योजनेंतर्गत 9.59 कोटी लाभार्थी आहेत
Comments
Post a Comment