प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE SCHEME

 
PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE SCHEME



प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) | PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE 


प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना कृषि  प्रक्रिया  उद्योगांकरीता एक लाख ते एक कोटीपर्यंत प्रोत्साहन योजना आहे.


 केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)


योजनेचा उद्देश


1. सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे ODOP उत्पादनांवर आधारीत वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/कंपनी , स्वयं सहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची पतमर्यादा वाढविणे .


 उत्पादनांचे ब्रॅन्डींग व विपणन अधिक बळकट करुन त्यांना संघटीत अशा पुरवठा साखळीशी जोडणे.

 महाराष्ट्रातील 21998 सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे.

सामाईक सेवा जसे की सामाईक प्रक्रिया सुविधा, साठवणुक, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.

अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे. - मार्गदर्शन व प्रशिक्षण.

प्रकल्प अहवाल बनवणे, ऑनलाइन अर्ज करणे, बँकांशी पाठपुरावा करणे, विविध परवाने काढणे इत्यादिसाठी संसाधन वेक्ती कडून विनामूल्य मदत.



 पात्र लाभार्थी

अ) वैयक्तिक लाभार्थी - वैयक्तिक लाभार्थी,भागीदारी संस्था,बेरोजगार युवक, महिला,प्रगतशील शेतकरी, मर्यादित भागिदारी संस्था (LLP), भागिदारी संस्था इ.  

1. उद्योगामध्ये १० पेक्षा कमी कामगार कार्यरत असावेत.

2. अर्जदाराचा उद्योगावर मालकी अधिकार (प्रोपायटरी/भागीदारी) असावा.

3. अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे व शिक्षण किमान आठवी पास असावे. एका कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र असेल.

4. सदर उद्योगाला औपचारिक दर्जा प्राप्त करुन देण्याची तयारी असावी.

5. पात्र प्रकल्प किंमतीच्या किमान 10-40% लाभार्थी हिस्सा देण्याची व उर्वरित बॅंक मुदत कर्ज घेण्याची तयारी असावी.


 

 ब) गट लाभार्थी - शेतकरीगट/ कंपनी/संस्था, स्वयंसहाय्यता गट,उत्पादक सहकारी संस्था इ.


1.“एक जिल्हा एक उत्पादन” (ODOP) धोरणानुसार निवडलेल्या उत्पादनाच्या प्रक्रियेमध्ये कार्यरत शेतकरी उत्पादक गट/कंपनी/संस्था/स्वयं सहायता गट/उत्पादक सहकारी संस्था यांना नवीन उद्योगाना प्राधान्य दिले जाईल. 

2. कंपनीची उलाढाल ही किमान रु.१ कोटी असावी.


3. कंपनीच्या सध्याच्या आर्थिक उलाढालीपेक्षा अधिक किंमतीचा प्रस्ताव असू नये. 


4. कंपनीच्या सभासदांना हाताळल्या जाणाऱ्या उत्पादनाबाबत पुरेशे ज्ञान व अनुभव असावा, तसेच सदर उत्पादनाच्या बाबतीतील किमान ३ वर्षांचा अनुभव असावा.


5. प्रकल्प किंमत व खेळत्या भांडवलासाठी 10-40% स्वनिधी भरण्यासाठीची तरतूद शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये असावी किंवा सदर रक्कमची राज्य शासनाची हमी असावी.


ड) मार्केटिंग व ब्रँडिंग:- पात्र प्रकल्पाच्या 50% अनुदान


इ) सामान्य पायाभूत सुविधा:- पात्र प्रकल्पाच्या 35%अनुदान


प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE SCHEME


पात्र प्रकल्प

नाशवंत शेतीमाल जसे फळे व भाजीपाला, तृणधान्ये, कडधान्ये, तेलबिया, मत्स्योत्पादन, मसाला पिके, दुग्ध व पशुउत्पादन,किरकोळ वनउत्पादने इ. मध्ये सद्यस्थितीत कार्यरत- ODOP/ Non ODOP उत्पादनांमध्ये कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे स्तरवृद्धी/विस्तारीकरण/ आधुनिकीकरण या लाभासाठी पात्र असतील. नविन स्थापित होणारे सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग केवळ ODOP पिकांमध्ये असावेत. 


एक जिल्हा एक उत्पादन (ODOP) उत्पादने


 आर्थिक मापदंड

1. वैयक्तिक सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बॅंक कर्जाशी निगडीत एकुण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% जास्तीत जास्त रु. 10.00 लाखाच्या मर्यादेत अनुदान दिले जाणार आहे. त्याकरिता www.pmfme.mofpi.gov.in या संकेतस्थळावरील PMFME MIS PORTAL वर Online अर्ज सादर केले जातात.


2. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक संस्था /कंपनी, स्वयं सहाय्यता गट / उत्पादक सहकारी संस्था यांना सामान्य पायाभुत सुविधा व भांडवली गुंतवणुकीकरिता इ. करिता बॅंक कर्जाशी निगडीत एकुण पात्र प्रकल्प खर्चाच्या 35% अनुदान देय आहे. याकरिता कमाल आर्थिक मर्यादा केंद्र शासनाकडून विहीत करण्यात येईल.या घटकासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयात ऑनलाईन/ ऑफलाईन पध्दतीने अर्ज सादर केले जातील.



3. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांमध्ये कार्यरत स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना खेळते भांडवल व छोटी मशिनरी घेण्याकरिता प्रती सदस्य रु. 40,000/- बीज भांडवल रक्कम देण्यात येणार आहे. स्वयं सहाय्यता गटातील सदस्यांना द्यावयाचे लाभ महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवन्नोन्नती अभियान (MSRLM) यांचेमार्फत राबविले जातात. त्यासाठी www.nrlm.gov.in या संकेतस्थळावरील NRLM PORTAL वर Online अर्ज सादर केले जातात. तसेच स्वयंसहाय्यता गटाच्या वैयक्तिक सदस्यास भांडवली गुंतवणूकीकरीता पात्र प्रकल्प किंमतीच्या 35% व कमाल रु.10 लाखाच्या मर्यादेत बँक कर्जाशी निगडीत अनुदान दिले जाईल.


 


सागरी उत्पादने - 

मत्स्य मासे लोणचे, सुकवलेले मासे, डबाबंद मासे, खारवलेले मासे, गोठवलेले मासे, चिप्स, वेफर्स, पापड, फिश Popcorn, नगेट्स, टिक्की, समोसा, पकोडा, इत्यादी.


 नाचणी - 

पीठ, पापड, बिस्कीटे, कुकीस, नाचणी सत्व,चकली, इडली, शंकरपाळी,इत्यादी.


 भगर -

पीठ,भगर,इत्यादी.


चिकू-

स्कॅश, पल्प, जाम, जेली, नेक्टर, स्लाईसेस, आईसक्रिम, कॅंडी, पावडर, ज्यूस,चॉकलेट,चॉकलेटबार,फ्रुटबार,वडी, ड्रायफ्रूट बर्फी फ्लेक्स, इत्यादी.


आंबा-

पल्प, जाम, जेली, मुरंबा, स्कॅश, नेक्टर, कोकटेल, स्लाईसेस, आईसक्रिम, ड्राइड स्लाईसेस, डबाबंद, ज्यूस, गोठवलेले, लोणचे, चटणी,फ्रुटबार, लश, सॉस, कुंदा,सॉफ्टकँडी,अल्कोहल विरहित पेय,इत्यादी.


केळी- 

चिप्स, प्यूरी, पल्प, वाईन, पावडर, वेफर्स, Concentrate, Figs, Flour, फ्रोझन स्लायसेस व डायसेस, जाम,फ्रुटी,बार, सुकेली टॉफी, ड्रायफ्रूट पिल कँडी,इत्यादी. 


कांदा -

फ्राईड कांदा, Dehydrated Onion Flakes, पेस्ट, पावडर, Strips , ऑईल, सॉस, लोणचे इत्यादी.


टोमॅटो -

केचअप, जाम, प्यूरी, सॉस, कॅन टोमॅटो, पेस्ट, टोमॅटो चटणी, RTE ,सूप,ज्यूस, लोणचे,इत्यादी.



दुग्ध व दुग्धजन्य -

बासुंदी, पनीर,लोणी, चीझ, आईसक्रिम, तूप, लस्सी, श्रीखंड, ताक, पेये, विप क्रिम, फॅट मिल्क, दही, दूध पावडर, व्हे प्रोटीन, खवा,मावा,छन्ना, संदेश,पेढा, कलाकंद,कुल्फी, रबडी,बर्फी, चक्का, श्रीखंड वडी, रसमलाई, रसगुल्ला,इत्यादी.


ज्वारी - 

Flakes, पिठ, पापड, माल्ट, कुकीज, स्टार्च, इत्यादी.


गहू-  

Flakes, पिठ, ब्रेड, माल्ट, बिस्कीट, कुकीज, स्टार्च, इत्यादी.


गुळ- 

गुळ पावडर, ज्यूस, यीस्ट, मॉलॅसेस, काकवी, इत्यादी.


द्राक्षे-        

बेदाणा, वाईन, ज्यूस, विनेगार, Sweet spreads, मनुका, वाईन स्वॅश, लोणचे,इत्यादी.


मका-

कॉर्न सिरप, पीठ, Flakes, ऑईल, स्टार्च,‍ Corn Stalk Fiddle, सॉस, पॉपकॉर्न इत्यादी.


मोसंबी-

ज्यूस,पल्प, RTS पेय, सिरप, जाम, जेली, नेक्टर, सायट्रीक ॲसीड, Concentrate, Marmalade, ड्रायफ्रूट,इत्यादी.


सिताफळ-    

 पल्प, जाम, जेली, पावडर, सीड ऑईल, आईसक्रिम, रबडी, बर्फी, ड्राइड स्नॅक्स, ज्यूस, कँडी,इत्यादी. 


पेरू-  

ज्यूस, जाम, जेली, पल्प, नेक्टर, टॉफी, RTS पेय, वाईन, प्यूरी,चॉकलेट, चीज, फ्रुटबार, टॉफीज,इत्यादी.


हरभरा-


बेसन पीठ, नमकीन, फूटाणे, डाळ इत्यादी.


तुर -

 डाळ,पीठ,इत्यादी.


मुग- 

पापड, डाळ, पीठ इत्यादी.


हळद-

पावडर, ड्राईड रायझोम, इत्यादी.


मिरची-

पावडर, ड्राईड मिरची,Flakes, लोणचे,डीहायड्रेशन,इत्यादी.


संत्रा-        

ज्यूस,पल्प, RTS पेय, सिरप, जाम, जेली, नेक्टर, सायट्रीक ॲसीड, Mandarin Concentrate,, Marmalade तेल - mandarin essential oil, Clementine Oil , इत्यादी.


सोयाबिन- 

तेल, टोफू, सोयामिल्क, सोयानट, सोयाचन्क, सोया प्रोटिन, सोया सॉस, सोया स्टिक, सोया चिप्स, पीठ, इत्यादी.


जवस-

चटणी, तेल, इत्यादी.


भात-        

पोहा, मुरमूरे, पीठ, पापड, ऑईल, Parboiled Rice, Flakes, बिअर, इत्यादी.


किरकोळ वन उत्पादने -

हिरडा पावडर, महुवा- तेल/पावडर/केक /बिस्कीट/ कुकीस/लोणचे/ इत्यादी. मशरुम- सुकवलेले मशरुम/बिस्कीट/कुकीस,मध, डिंक,इत्यादी. 


 प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE SCHEME


अधिक माहितीसाठी

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (सर्व) 

उपविभागीय कृषि अधिकारी (सर्व) 

तालुका कृषि अधिकारी (सर्व) 

www.pmfme.mofpi.gov.in

www.krishi.maharashtra.gov.in


एक जिल्हा एक उत्पादन ODOP | PMFME 2023

 

महाराष्ट्रातील समाविष्ट जिल्हे 36 जिल्हे.


1.अहमदनगर - दूध आधारित उत्पादने 


2. अकोला - कडधान्य आधारित उत्पादन (कबूतर वाटाणा, हरभरा- मैदा इ.) 


3. अमरावती - संत्रा 


4. औरंगाबाद - मका आधारित उत्पादने 


5. बीड -  सीताफळ


6. भंडारा - तांदूळ आधारित उत्पादने 


7. बुलढाणा - पेरू 


8. चंद्रपूर - तांदूळ आधारित उत्पादने 


9. धुळे - केळी 


10. गडचिरोली - गौण वनउत्पादन (महुआ/मध/हिरडा/बेहडा इ.) 


11. गोंदिया - तांदूळ आधारित उत्पादने (पोहे, मुरमुरा इ.) 


12. हिंगोली - मसाल्यावर आधारित उत्पादने (हळद इ.) 


13. जळगाव - केळी 


14. जालना - गोड संत्रा 


15. कोल्हापूर - उसावर आधारित उत्पादने (गूळ इ.) 


16. लातूर - टोमॅटो 


17. मुंबई - सागरी उत्पादने 


18. मुंबई - उपनगरीय सागरी उत्पादने 


19. नागपूर - संत्रा ऑरेंज 


20. नांदेड - मसाल्यांवर आधारित उत्पादने (हळद, मिरची) 


21. नंदुरबार - बाजरी आधारित उत्पादने (हिल बाजरी, फिंगर बाजरी इ.) 


22. नाशिक - कांदा 


23. उस्मानाबाद - डाळीवर आधारित उत्पादने (हरभरा, मूग, तूर-डाळ, मैदा इ.) 


24. पालघर - सपोटा 


25. परभणी - उसावर आधारित उत्पादने (गूळ) 


26. पुणे - टोमॅटो 


27. रायगड - सागरी उत्पादने (मासे, कोळंबी इ.) 


28. रत्नागिरी - आंबा 


29. सांगली - द्राक्षे 


30. सातारा - उसावर आधारित उत्पादने (गूळ इ.) 


31. सिंधुदुर्ग - आंबा 


32. सोलापूर - बाजरीवर आधारित उत्पादने (ज्वारी, गहू) 


33. ठाणे - बाजरीवर आधारित उत्पादने (हिल बाजरी/नाचणी इ.) 


34. वर्धा - मसाले (हळद इ.) 


35. वाशिम - तेल बियाणे आधारित उत्पादने (सोयाबीन, फ्लेक्स बियाणे, तिळ) इ.) 


36. यवतमाळ - मसाले (हळद इ.) एकूण ३



प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग अंमलबजावणीत महाराष्ट्र आघाडीवर  (PMFME)


प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE SCHEME


काय आहे योजना पहा.


👇👇

आतापर्यंत या योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी बँकेकडे सादर प्रकरणे २ हजार २३० इतकी आहेत. बँकेने मंजूर केलेली प्रकरणे २३५ इतकी आहेत. आतापर्यंत प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत मिळालेले रु.६५ कोटी इतके अनुदान शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे.


प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत देशामध्ये ३२१८ अर्जांना मंजूरी देण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्र राज्य आघाडीवर आहे. महाराष्ट्रात एकूण ५७९ अर्जाना मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्रापाठोपाठ आंध्रप्रदेश ३२१, कर्नाटक २९५, मध्यप्रदेश २९२, उत्तरप्रदेश २२९, तमिळनाडू २०६, मणिपूर १८३, तेलंगणा १७०, हिमाचल प्रदेश १५८, ओडिसा १५०, पंजाब १४३ व राजस्थान १०७ असे इतर राज्यात मंजूरीचे प्रमाण आहे


प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. तरी सुध्दा ‘एक जिल्हा, एक उत्पादन‘ अंतर्गत निवडलेली उत्पादने तसेच जी.आय. मानांकन मिळालेल्या पिके व उत्पादनांची मुल्यसाखळी बळकट करण्यासाठी कृषी विभाग प्रयत्नशील आहे.


प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत (PMFME) महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्हयांनी आपला सहभाग नोंदविला आहे. औरंगाबाद, सांगली व पुणे जिल्ह्यांनी या योजनेच्या अंमलबजावणीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या आर्थिक वर्षांत योजनेची माहिती पात्र व गरजू लाभार्थीपर्यंत पोहचवून दर्जेदार कामगिरी करावी.


योजनेचा उद्देश :-

सध्या कार्यरत असलेले व नवीन स्थापित होणारे वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग तसेच शेतकरी उत्पादक गट/संस्था/ कंपनी,स्वयं सहाय्यता गट व सहकारी उत्पादक संस्था यांची पतमर्यादा वाढविणे.

उत्पादनांचे ब्रॅंन्डींग व विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशा पुरवठा साखळीशी जोडणे.

महाराष्ट्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणण्यासाठी सहाय्य करणे.

सामाईक सेवा जसे की साठवणूक,प्रक्रिया सुविधा, पॅकेजिंग, विपणन तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्वंकष सेवांचा सूक्ष्म उद्योगांना अधिक लाभ मिळवून देणे.

अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण यावर भर देणे.

सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांनी व्यावसायिक व तांत्रिक सहाय्याचा अधिकाधिक लाभ घ्यावा यासाठी प्रयत्न करणे.

या उद्देशाने ही योजना केंद्र शासनाने सुरू केली आहे.


योजनेसाठी पात्र लाभार्थी –

फळे,भाजीपाला, अन्नधान्य, कडधान्ये, तेलविया, मसाला पिके, मत्स्य, दुग्ध व किरकोळ वन उत्पादनांवर आधारित सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग.

वैयक्तिक लाभार्थी,युवक, शेतकरी, महिला उद्‌योजक, कारागीर, बे भागीदार व मर्यादित दायित्व असलेले भागीदार.

गट लाभार्थी स्वंय सहाय्यता गट (SHG),शेतकरी उत्पादक गट/संस्था/ उत्पादक सहकारी संस्था इ.

“एक जिल्हा, एक उत्पादन” ODOPअंतर्गत नवीन व सद्य:स्थितीत कार्यरत तसेच NON-ODOP सद्य स्थितीत कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उदयोगांचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण.


गरजू व पात्र लाभार्थ्यांनी 👇👇

अधिक माहितीसाठी

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी (सर्व) 

उपविभागीय कृषि अधिकारी (सर्व) 

तालुका कृषि अधिकारी (सर्व) 

www.pmfme.mofpi.gov.in

www.krishi.maharashtra.gov.in


Comments

Popular posts from this blog

घरकुल यादी जाहीर तुमच्या गावची यादी पहा PM Awas Gharkul yojana list 2023 Maharashtra..!

ग्रामपंचात मध्ये मंजूर कामे पहा आपल्या मोबाईल वर .View approved works in Gram Panchayat on your mobile.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आपडेट Silt Free Dam and Silt Shiwar Scheme

Aadhar व PAN कार्ड लिंक करा नसता होईल दंड Aadhar and PAN card linking is mandatory

केंद्रीय आभा हेल्थ कार्ड काढा आपल्या मोबाईलवर. Kendriya Abha Health Card.

मनरेगातून तूती रेशम लागवड करा आणि 335000 अनुदान मिळवा ..!

ऊस हार्वेस्टर 35 लाख रु अनुदान..! काय अटी शर्टी, अर्ज कुठे कसा करायचा. Sugarcane harvester Rs 35 lakh grant..!

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ आणखी काय पहा .. National Helpline for Senior Citizens 14567 See more..