शेतकऱ्यांसाठी गाय व म्हैस शेळीपालन कुक्कुटपालन योजना ... ! Cow and Buffalo Goat Rearing Poultry Rearing Scheme for Farmers ... !

 




शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राज्य योजना

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत "शरद पवार ग्रामसमृध्दी योजना" राज्य योजना राबविण्यास  आहे.

त्या योजनेत, ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शरद पवार ग्रामसमृध्दी योजने अंतर्गत खालील नमूद केलेल्या 3 वैयक्तिक कामांना सर्वोत्तम प्राधान्यक्रमाने सर्व ग्रामपंचायत पंचायत समिती क्षेत्रात राबविण्यात आला. एका गावात जास्तीत जास्त गोठयांची मर्यादा या शासन निर्णयान्वये वगळण्यात येत आहे.

 

GR पहा      👇🏼👇🏼

) गाय म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे

२) शेळीपालन शेड बांधणे 

3) कुक्कुटपालन शेड बांधणे 

 

अर्ज पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा 

https://bit.ly/3JZfWjq


गाय  म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे :

सद्य:स्थिती :-

 

ग्रामीण भागामध्ये जनावरांच्या गोठ्याची जागा ही सर्वसाधारणपणे ओबडधोबड खाचखळग्यानी भरलेली असते, सदरचे गोठे हे क्वचितच व्यवस्थितरित्या बांधले जातात. गोठ्यांमध्ये मोठया प्रमाणावर जनावरांचे शेण मूत्र पडलेले असते तसेच पावसाळयाच्या दिवसांत गोठयातील जमिनीस दलदलीचे स्वरुप प्राप्त होते सदर जागेतच जनावरे बसत असल्यामुळे ते विवीध प्रकारच्या आजारांना बळी पडतात. तसेच काही जनावरांना स्तनदाह होऊन उपचारांसाठी हजारो रुपये खर्चहोतात. तर काही वेळेस गाई/ म्हशींची कास निकामी होते, त्यांच्या शरीराच्या खालील बाजूस जखमा होतात. बऱ्याच ठिकाणी जनावरांना चारा देण्यासाठी गव्हाणी बांधलेल्या नसतात. त्यांच्यापुढील मोकळया जागेवरच चारा टाकला जातो. या चाऱ्यावर बऱ्याच वेळा शेण मूत्र पडल्याने जनावरे चारा

खात नाही हा चारा वाया जातो. हे टाळण्यासाठी जनावरांच्या गोठ्यामध्ये जनावरांना चारा खाद्य देण्यासाठी गव्हाण बांधणे अत्यावश्यक आहे.

 

शासनाचा GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ओपन करा 

https://bit.ly/3FDelgz

सुधारणेची गरज :-

 

गोठयातील ओबडधोबड जमिनीमुळे जनावरांपासून मिळणारे मौल्यवान मूत्र शेण यांचा संचय करता आल्यामुळे ते मोठया प्रमाणावर वाया जाते. जनावरांचे मूत्र शेण हे एक उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत असल्याने जनावरांच्या गोठयातील जागा ही सिमेंट कॉंक्रीटचा वापर करुन पक्क्या स्वरुपात सपाटीकरण केल्यास जनावरांपासून मिळणाऱ्या मूत्र शेण गोठयाशेजारील खडडयामध्ये एकत्र जमा करुन त्याचा शेतजमिनीची सुपिकता उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी उपयोग करून घेता येईल.

 

अनुज्ञेयता :-

, गुरांकरिता २६.९५ चौ. मी. जमीन पुरेशी आहे. तसेच त्याची लांबी . मी. आणि रुंदी . मी. असावी. गव्हाण . मी. X . मी. X .६५ मी. आणि २५० लीटर क्षमतेचे मूत्रसंचय टाके बांधण्यात यावे. जनावरांना पिण्याच्या पाण्याची २०० लिटर क्षमतेची टाकी सुध्दा बांधण्यात यावी.

सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेव्या निकषानुसार स्वतःची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. गोठ्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांचे टॅगिंग आवश्यक राहील. या कामाला नियोजन (रोहयो) विभागाच्या दिनांक शासन परिपत्रकातील परिशिष्ट मधील अनुक्रमांक ७५ नुसार नरेगा अंतर्गत रु.७७,१८८/- इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

अकुशल खर्च                       रु.,१८८/- ( प्रमाण टक्के)

कुशल खर्च                        रु.७१,०००/- (प्रमाण ९२ टक्के)

एकूण                           रु. ७७,१८८/- (प्रमाण १०० टक्के)                    

 

 

शासनाचा GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ओपन करा 

https://bit.ly/3FDelgz

 

उपरोक्त शासन परिपत्रकातील गुरांसाठीची तरतूद रद्द करुन दोन गुरे ते गुरे करिता एक गोठा त्यानंतरच्या अधीकच्या गुरांसाठी च्या पटीत म्हणजेच १२ गुरांसाठी दुप्पट १८ पेक्षा जास्त गुरांसाठी पट अनुदान देय राहील मात्र पटीपेक्षा जास्त अनुदान अनुज्ञेय राहणार नाही.

 

२. शेळीपालन शेड बांधणे :-

 

सद्य:स्थिती :-

 

शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील कुटूंबाच्या उपजिवीकेचे महत्वाचे साधन आहे. अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटूंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी शेळीपालन या व्यवसायाकरिता मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील शेळी मेंढी पालनावर उदरनिर्वाह करणारी गोरगरीब कुटूंबे पैशाअभावी शेळया मेंढयाना चांगल्या प्रकारचा सरंक्षित निवारा देऊ शकत नाहीत. चांगल्या निवाऱ्याअभावी शेळया मेंढयामध्ये विवीध प्रकाराचे जतजन्य संसर्गजन्य, बाहयपरजीवी किटकांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगग्रस्त, खुरटी आर्थिकदृष्टया फारशी किफायतशीर नसलेल्या शेळया मेंढयाचे कळप पाळले जातात. याकरिता मागणी केलेल्या प्रत्येक कुटूंबास नरेगा योजनेअंतर्गत शेळीपालन शेड बांधणे हे काम उपलब्ध करुन देण्यात येईल.

 


अर्ज पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा 

https://bit.ly/3JZfWjq


सुधारणेची गरज :-

 

ग्रामीण भागामध्ये शेळया मेंढयापासून मिळणारे शेण, लेंडया मूत्र यापासून तयार होणा-या उत्कृष्ठ दर्जाच्या सेंद्रीय खतांचा पक्क्या स्वरुपाचे चांगले गोठे नसल्याने नाश होतो. शेळया - मेंढयाकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र एकत्र करून शेतीमध्ये उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत म्हणून वापर करता येईल. यामुळे शेतीच्या सुपिकतेबरोबरच शेती उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होऊन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकेल.

 

नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक तसेच नियोजन (रोहयो) विभाग शासन निर्णय, १०. शेळयांकरिता .५० चौ.मी. निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लांबी .७५ मी. आणि रुंदी . मी. असावी. चारही भितीची सरासरी उंची .२० मी. असावी. मिती प्रमाण असलेल्या सिमेंटच्या विटांच्या असाव्यात. छतास लोखंडी तुळयांचा आधार देण्यात यावा. छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे / सिमेंटचे पत्रे वापरावेत. तळासाठी मुरुम घालावा. शेळयांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधावी.

 

सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील, तसेच भूमिहीन (शेती नसलेले) कुटूंबाना प्राधान्य देण्यात यावे.

 


शासनाचा GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ओपन करा 

https://bit.ly/3FDelgz



अनुज्ञेयता :-

 

या कामाला नियोजन (रोहयो) विभागाच्या शासन परिपत्रक नुसार नरेगा अंतर्गत रु. ४९,२८४/- इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

अकुशल खर्च                      रु. ,२८४/- (प्रमाण टक्के)

कुशल खर्च एकूण                  रु. ४५,०००/-(प्रमाण ९२ टक्के)

एकूण                           रु. ४९, २८४/- (प्रमाण १०० टक्के)

 

तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजुरी प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एक किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल. त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक / जिल्हा कार्यक्रम सह समन्वयक / आयुक्त, मग्रारोहयो यांना प्रदान करण्यात येत आहे.

 

लाभार्थाने शेळीची व्यवस्था स्वतः करणे:

शेळी ही गरीबाची गाय समजली जाते. मुख्यतः भूमिहीन शेतमजूर शेळी पालन करतात. भूमिहीन शेतमजूराकडे समृद्धी करिता शेतजमीन नसल्यामुळे शेळीपालन किंवा तत्सम बाबीच श्रीमंती करिता शिल्लक राहतात. शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे १० शेळ्यांचा एक गट दिला जातो. शासनाचे अनुदान मिळाल्यास एका भूमिहीन शेतकऱ्याला स्वतःच्या पैशातून दहा शेळ्या विकत घेणे शक्य होत नाही. त्यामुळे हे स्पष्ट करण्यात येते की दहापेक्षा कमी शेळ्यांचा गट असल्यास त्या शेतमजुराला गरिबीतून बाहेर पडणे अवघड जाते. सध्या बाजारात एक शेळी अंदाजे आठ हजार रुपयात मिळते. रोजगार हमी योजनेतून हा खर्च अनुज्ञेय नाही. एक भूमिहीन शेतमजूर स्वताच्या पुजीतून दोन शेळ्या जर विकत घेऊ शकला तर त्या शेळ्यांची संख्या दर सहा महिन्यात किमान दोन पट होते त्यामुळे एका वर्षांत त्या शेतमजूर/ शेतकरी यांच्याकडे १० शेळ्यांचा गट निर्माण होऊ शकतो. त्यामुळे उपरोक्त सर्व बाबी पाहता किमान दोन शेळ्या असलेल्या भूमिहीन मजुरांना शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ योग्य होईल.

 

तसेच हेही स्पष्ट करण्यात येते की शेळीपालनाच्या शेडसाठी प्रत्येक दहा शेळ्यांसाठी एक गट समजण्यात येईल त्याप्रमाणे परिपत्रकानुसार अनुदान अनुज्ञेय करण्यात येईल तसेच, ज्या लाभार्थ्याकडे १० पेक्षा अधीक शेळ्या असतील त्यांना शेळ्यांसाठीचे दोन गट लक्षात घेवून दोन पटः अनुदान राहील. मात्र एका कुटुंबास जास्तीत जास्त ३० शेळ्यांकरिता तीन पट अनुदान मंजूर करण्यात येईल.

 


 अर्ज पाहण्यासाठी खालील लिंक ओपन करा 

https://bit.ly/3JZfWjq


3. कुक्कुटपालन शेड बांधणे :

सद्य:स्थिती :-

 

परसातील कुक्कूट पालनामुळे ग्रामीण भागातील कुटूंबाना पूरक उत्पादनाबरोबरच आवश्यक पोषक प्राणीजन्य प्राथिनांचा पुरवठा होतो. खेडयामध्ये कुक्कूटपक्षांना चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. कुक्कूटपक्ष्यांचे उन पाऊस, परभक्षी जनावरे वारंवार येणा-या आजारांपासून सरंक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. चांगल्या निवा-यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे, पिल्लांचे अंडयाचे परभक्षी प्राण्यांपासून संरक्षण होण्यास मदत होईल.

 

सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील. तसेच भूमिहीन (शेती नसलेले) कुटूंबाना प्राधान्य देण्यात यावे. या कामाला नियोजन (रोहयो) विभागाच्या रोजीच्या शासन परिपत्रकातील मधील ७७ नुसार नरेगा अंतर्गत रु. ४९,७६०/- इतका अंदाजित खर्च येईल. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे


 

अकुशल खर्च                                     रु. ,७६०/-(प्रमाण १० टक्के)

कुशल खर्च                                      रु. ४५,०००/- (प्रमाण ९० टक्के)

एकूण                                          रु.४९, ७६०/- (प्रमाण १०० टक्के)

                                         

 

शासनाचा GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ओपन करा 

https://bit.ly/3FDelgz

 

तथापि हे मापदंड सध्या प्रचलित मजूरी दर DSR प्रमाणे आहे. जेव्हा केव्हा या दोनपैकी कोणत्याही एक किंवा दोन्हींच्या दरात बदल होईल तेव्हा या अंदाजित खर्चात बदल होईल. त्या प्रकारच्या बदलास मान्यता देण्याचा अधिकार जिल्हा कार्यक्रम समन्वयक / जिल्हा कार्यक्रम सह समन्वयक / आयुक्त, मग्रारोहयो यांना प्रदान करण्यात येत आहे.

 

अनुज्ञेयता :-

 

नियोजन (रोहयो) विभाग शासन परिपत्रक अन्वये तसेच नियोजन (रोहयो) विभाग शासन निर्णय मधील  १०० पक्ष्यांकरिता .५० चौ.मी. निवारा पुरेसा आहे तसेच त्याची लांबी .७५ मी. आणि रुंदी . मी. असावी. लांबीकडील बाजूस ३० सेमी उंच २० सेमी जाडीची, विटांची जोत्यापर्यंत भिंत असावी. तसेच छतापर्यंत कुक्कूट जाळी ३० सेमी x ३० सेमीच्या खांबानी आधार दिलेली असावी. आखूड बाजूस २० सेमी जाडीची सरासरी .२० मीटर उंचीची भिंत असावी. छतास लोखंडी तुळयांचा आधार द्यावा. छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे / सिमेंटचे पत्रे वापरावेत. तळयाच्या पायासाठी मुरुमाची भर घालावी त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा सिमेंटचा प्रमाण असलेला मजबूत थर असावा. पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.

 

लाभार्थ्याने पक्ष्यांची व्यवस्था स्वतः करणे :-

 

       सध्या शासन परिपत्रकानुसार १०० पक्ष्यांकरिता अनुदान अनुज्ञेय आहे. मात्र, यामध्ये असे स्पष्ट करण्यात येते की, ज्या शेतकऱ्यांना / शेतमजूरांना कुक्कुटपालन करावयाचे आहे. परंतु, १०० पेक्षा अधीक पक्षी ज्यांच्याकडे नाहीत अशा लाभार्थ्यांनी १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर दोन जामिनदारांसह कुक्कुटपालन शेडची मागणी करावी त्यानुसार संबंधीत यंत्रणेने संबंधीत लाभार्थ्यास शेड मंजूर करावे शेडचे काम पूर्ण झाल्यानंतरच्या महिन्यांच्या कालावधीत कुक्कुटपालन शेडमध्ये १०० पक्षी पाळण्यासाठी आणणे बंधनकारक राहील. जरी शेड १०० पक्ष्यांकरिता अनुज्ञेय करण्यात आले असले तरीही सदर शेडमध्ये १५० पक्षी सामावू शकतात. त्यामुळे १०० पक्षी यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या १५० च्या वर नेल्यास सदर लाभार्थ्यास मोठ्या शेडसाठी दोनपट निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. तथापि, कोणत्याही कुटुंबास दोनपट पेक्षा अधीक निधी अनुज्ञेय राहणार नाही. अन्य तरतूदी उपरोक्त परिपत्रकानुसार राहतील.

 


Comments

Popular posts from this blog

घरकुल यादी जाहीर तुमच्या गावची यादी पहा PM Awas Gharkul yojana list 2023 Maharashtra..!

ग्रामपंचात मध्ये मंजूर कामे पहा आपल्या मोबाईल वर .View approved works in Gram Panchayat on your mobile.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना आपडेट Silt Free Dam and Silt Shiwar Scheme

Aadhar व PAN कार्ड लिंक करा नसता होईल दंड Aadhar and PAN card linking is mandatory

केंद्रीय आभा हेल्थ कार्ड काढा आपल्या मोबाईलवर. Kendriya Abha Health Card.

मनरेगातून तूती रेशम लागवड करा आणि 335000 अनुदान मिळवा ..!

ऊस हार्वेस्टर 35 लाख रु अनुदान..! काय अटी शर्टी, अर्ज कुठे कसा करायचा. Sugarcane harvester Rs 35 lakh grant..!

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना PMFME PRADHAN MANTRI FORMALISATION OF MICRO FOOD PROCESSING ENTERPRISE SCHEME

ज्येष्ठ नागरिकांना राष्ट्रीय हेल्पलाईन १४५६७ आणखी काय पहा .. National Helpline for Senior Citizens 14567 See more..