मनरेगातून तूती रेशम लागवड करा आणि 335000 अनुदान मिळवा ..!
मनरेगातून तूती रेशम लागवड
करा रेशमाची शेती पिकवा मातीतून मोती
|
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामिण रोजगार हमी योजनेचा मूळ उद्देश आहे.शेतीविषयी शाश्वत विकासा करिता मनरेगाच्या एकुण कामापैकी 65% कामे कृषी निगडीत प्रस्तावित करीत असतो. आज पावेतो निसर्गाच्या लहरीपणामुळे पारंपारिक पिकांना मिळणारे उत्पन्न सरासरी पेक्षा कमी झाल्याचे दिसून येते. ग्रामिण भागातले लोक शहराकडे स्थलांतरीत झाल्याचे दिसत आहेत.
मनरेगातून तूती रेशम लागवड
शेतकरी आत्महत्या ही होत आहे, बेकारी वाढत आहे. हे थांबविण्यासाठी मनरेगातून रेशीम उद्योग करणे उत्तम उपाय आहे. बीड जिल्ह्याचे हवामान, जमीन पाहता तूती लागवड व रेशीम किटक संगोपनास उपयुक्त व फायदेशीर आहे. तूतीच्या झाडाची लागवड एकदा केल्यानंतर त्यापासून 14 वर्ष पाल्याचे उत्पादन घेता येते. रेशीम पिक कमी कालावधीचे असल्यामुळे 25 ते 30 दिवसात एक पिक पूर्ण होते. शेतकरी वर्षातून पाण्याच्या उपलब्धतेनुसार तीन ते सहा पीके घेवू शकतो. '' मनरेगातून तूती रेशम लागवड '' या उद्योगाचे तंत्रज्ञान सोपे, कमी श्रमाचे असल्यामुळे स्त्री, पुरूष शेतकऱ्यांना सहज करता येते. सन 2021-22 मध्ये बीड जिल्ह्यात 3593 शेतकऱ्याने 3686 एकरवर तूती लागवड केली असून सरासरी उत्पादन 1023.61 लक्ष घेतले आहे. विशेष म्हणजे बीड जिल्हा हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा तूती लागवडीचा म्हणून नावारूपाला येत आहे. या करिता श्री विनीत पवार रेशीम लागवड अधिकारी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.
तूती रेशम लागवड
मनरेगातून तूती रेशम लागवड
मनरेगातून रेशीम लागवड करायची असल्यास समृध्दी बजेट मध्ये मनरेगाच्या आराखड्यात नाव समाविष्ट करून घ्यावे. तसेच रेशीम जिल्हा कार्यालयाचा सभासद व्हावे. संबंधीत कामांना तांत्रिक मान्यता रेशीम लागवड अधिकारी देतात. प्रशासकिय मान्यता तहसिलदार देतात. मनरेगा योजने अंतर्गत एक एकर तूती लागवड व शेडसाठी तीन वर्षात अकुशल 2,2196 कुशल 113780 असे एकुण 3,35740 रूपये शेतकऱ्यास अनुदान दिले जाते. शेतकऱ्याची निवड कागदपत्रे व इतर माहिती आपल्या https://youtube.com/@ abhimanyukolhe या चॅनलवर मिळेल .
सन 2019-20 पासून जिल्हा रेशीम कार्यालय व कृषी विभाग मार्फत पोकरा प्रकल्प (नानाजी देशमुख कृषी प्रकल्प अंतर्गत योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या गावांचा तूती रोपवाटिका, तूती लागवड, किटक संगोपनगृह व किटक संगोपन साहित्य योजनेकरीता शेतकऱ्यांना 2,20229 रूपये अनुदानाचा लाभ मिळत आहे.या व्यतीरिक्त पोकरा योजनेअंर्तगत किटकाच्या बागेची देखभालीसाठी मदत करणे. बाल किटक संगोपना सहित उपलब्ध करणेसाठी मदत करणे, मल्टीएन्ट रिलींग मशिन (10 बेसीन) उभारणी करणेसाठी मदत करणे. अॅटोमॅटीक रिलींग मशिन (ARM) 200 एन्डस, रेशीम धाग्याला पिळ देणारे यंत्र (480) एन्डस उभारणी, मास्टर रिलर्स आणि तंत्रज्ञ यांची सेवा पुरविणारे इ. घटकाचा रेशीम शेतकरी उत्पादक कंपनी/ गटांना लाभ देता येते. केंद्रीय रेशीम मंडळाचे ISDSI योजनेमधून अनुदान देण्यात येते. जिल्हा वार्षीक योजनेमधून अंडीपुंजाच्या एकुण किंमती 75% अनुदान देण्यात येते.चला तर मनरेगातून रेशीम लागवड करू या आपले कुटूंब समृध्द घडवू या..!
Comments
Post a Comment